अतिवृष्टीचा फटका! कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिर ३ दिवस बंद; ११ ते १३ जुलैदरम्यान दर्शनास बंदी


अतिवृष्टीचा फटका! कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिर ३ दिवस बंद; ११ ते १३ जुलैदरम्यान दर्शनास बंदी

कार्ला (मावळ) | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध श्री एकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांलगतचा रस्ता अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी खचल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर ११ ते १३ जुलै या कालावधीत दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
या कालावधीत गडावर भाविक, पर्यटक तसेच वाहनांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिसरात आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे.
घाट रस्त्यावर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून पोलीस व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती लक्षात घेता भाविकांनी अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिराकडे जाण्याचे टाळावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!