सांगली जिल्हाच्या राजकारणात खळबळ : ईश्वरपूर नागराध्यक्षांचे पद रद्द :-
सांगली :दी. 12 जुलै :-ईश्वरपूर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांचे नगरसेवक व नगराध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे. पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ही कारवाई केली.
मलगुंडे व त्यांच्या बंधूंच्या संयुक्त मालकीच्या लॉजिंग व शॉपिंग सेंटरच्या इमारतीत बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.
Views: 61







