पारध (शाहुराजे) येथून पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना उत्साहात निरोप
पारध (शाहुराजा), ता. भोकरदन : आषाढी वारीनिमित्त पारध (शाहुराजा) येथून पिंपळगाव रेणुकाई येथील ह. भ. प. श्री विष्णू महाराज सास्ते व ह. भ. प. श्री अंबादास महाराज लोखंडे, पारधकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांचा पंढरपूर पायी वारीचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. पुढील बारा दिवस पायी वारीचा आनंद घेत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी माजी सभापती श्री परमेश्वर पाटील लोखंडे, माजी सरपंच श्री अशोक पाटील लोखंडे, माजी सरपंच श्री गणेश पाटील लोखंडे, छत्रपती संभाजीनगर येथील श्री राजू भास्करराव देशमुख (सहपत्नीक), श्री पंजाब देशमुख तसेच श्री विष्णू लोखंडे यांच्यासह वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी गावातील समाधान भिकाजी लोखंडे, दिलीप पाटील लोखंडे, जयंत पाटील लोखंडे, सुरेश आल्हाट, संतोष पाखरे,पवन लोखंडे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक,भाविक,महिला मंडळ, भजनी मंडळ तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. “रामकृष्ण हरी”, “ज्ञानोबा-तुकाराम” अशा नामघोषांनी परिसर भक्तिमय झाला होता. उपस्थितांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचा प्रवास सुखरूप, मंगलमय व विठ्ठलाच्या कृपेने यशस्वी होवो, अशी प्रार्थना केली.
वारकऱ्यांना निरोप देताना ग्रामस्थांनी विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात भावपूर्ण वातावरणात वारीसाठी रवाना केले. गावकऱ्यांनी सर्व वारकऱ्यांना सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा देत विठ्ठल चरणी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
प्रतिनिधी महेंद्र बेराड





