सांगलीत स्वामी समर्थ घाटावर तरुणाच्या हत्तेमुळे खळबळ : पोलीस यंत्रणा अलर्ट :-


सांगलीत स्वामी समर्थ घाटावर तरुणाच्या हत्तेमुळे खळबळ : पोलीस यंत्रणा अलर्ट :-

सांगली : दी. 14 जुलै :-कृष्णा नदीकाठावरील स्वामी समर्थ घाट परिसरात आज एका २० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने सांगली शहरात खळबळ उडाली आहे. चैतन्य तोरणे (रा. टिंबर एरिया, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून चौघा हल्लेखोरांनी चैतन्यवर अचानक हल्ला केला. धारदार शस्त्राने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस करीत असून हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत.

पत्रकार : विजय रणभोर,पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!