वसईत FDAचे बनावट अधिकारी बनून मिठाई व्यावसायिकाची ६ लाखांची फसवणूक; तिघांसह टोळीवर गुन्हा


वसईत FDAचे बनावट अधिकारी बनून मिठाई व्यावसायिकाची ६ लाखांची फसवणूक; तिघांसह टोळीवर गुन्हा

वसई : वसईमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) चे बनावट अधिकारी बनून एका मिठाई व्यावसायिकाकडून ६ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सुकडिया यांच्या मिठाईच्या दुकानावर कारवाई करून दुकान सील करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत आरोपींनी सुरुवातीला १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. अखेर ६ लाख रुपयांवर तडजोड करून आरोपींनी ही रक्कम उकळली.

नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहित सुकडिया यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून विजय जाधव, स्वाती तुळसकर, स्वाती राठोड तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात या टोळीने यापूर्वी बोरिवली परिसरातही अशाच प्रकारे व्यावसायिकांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास माणिकपूर पोलीस करत असून, अशा प्रकारच्या बनावट अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!