मीरा रोड येथील एन. एल. डालमिया एज्युकेशन इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न


मीरा रोड येथील एन. एल. डालमिया एज्युकेशन इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

मुंबई : मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरातील भक्तिवेदांत रुग्णालयासमोरील एन. एल. डालमिया एज्युकेशन संस्थेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आज भीषण आग लागल्याची घटना घडली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याचा तपास केला जाणार आहे.
घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक प्रशासनही उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!