बारामतीच्या श्रावणी कुदळेची ऐतिहासिक कामगिरी; नीट फेरपरीक्षेत देशातील मुलींमध्ये प्रथम बारामती :तणाव आणि पेपरफुटीच्या वादांनंतर जाहीर


बारामतीच्या श्रावणी कुदळेची ऐतिहासिक कामगिरी; नीट फेरपरीक्षेत देशातील मुलींमध्ये प्रथम

बारामती :तणाव आणि पेपरफुटीच्या वादांनंतर जाहीर झालेल्या नीट (NEET) फेरपरीक्षेच्या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बारामतीच्या श्रावणी कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवत देशात पाचवा क्रमांक पटकावला असून, देशातील सर्व मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
श्रावणीच्या या ऐतिहासिक यशामुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. तिच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण अभ्यासाचे आणि जिद्दीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दरम्यान, मुंबईचा रोशमीत गुप्ता यानेही उत्कृष्ट कामगिरी करत मुंबई शहरात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रतिकूल परिस्थिती, परीक्षेतील अनिश्चितता आणि विविध अडचणींवर मात करत या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
नीट फेरपरीक्षेच्या निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!