भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू; तिकीट दर फक्त ५ रुपयांपासून
नवी दिल्ली :भारतीय रेल्वेने हरित आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
हरियाणातील जिंद–सोनीपत मार्गावर धावणाऱ्या या ट्रेनच्या तिकिटाची किमान किंमत अवघी ५ रुपये ठेवण्यात आली असून, ही रक्कम अनेक रेल्वे स्थानकांवरील १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही कमी आहे. प्रवासाच्या अंतरानुसार कमाल तिकीट दर २५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
ही हायड्रोजन ट्रेन पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असून, पारंपरिक डिझेल इंजिनांच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत करणार आहे. हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम मानला जात आहे.
या ट्रेनच्या माध्यमातून भारत हायड्रोजन-आधारित रेल्वे सेवा सुरू करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. कमी भाडे, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण संरक्षण यांचा संगम असलेली ही सेवा भविष्यात देशातील इतर मार्गांवरही विस्तारली जाण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






