शालेय साहित्य वाटप करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन


शालेय साहित्य वाटप करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पारध शाहूराजे, ता. भोकरदन (प्रतिनिधी/महेंद्र बेराड ):
पारध शाहूराजे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर, शाहीर सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवीतील वाचन व लेखनात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास केळणा अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव उदयसिंह दादा लोखंडे, मुख्याध्यापिका उर्मिला शिंदे, पर्यवेक्षक महिंद्र लोखंडे, प्रा. नारायण पाटील, प्रा. शिवाजी गडदे, पालक विजय बोर्डे, ठाणसिंग पूर्भे, तेजराव दांडगे, प्रा. संग्रामराजे देशमुख, प्रा. विनोद सोनगिरे, सौ. लता वानखेडे, श्री ए. टी. सोनुने व आर. ए. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी आणि वाचन-लेखनाची आवड जोपासावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमास पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय साहित्याचे वाटप करून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!