विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; वंचित बहुजन आघाडीचे आवाहन
मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत राज्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
दरम्यान, या बंदला इतर राजकीय पक्ष किंवा संघटनांचा कितपत पाठिंबा मिळणार, तसेच प्रशासनाकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






