पुण्यात १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत


पुण्यात १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा मोबाईल दुरुस्तीसाठी गेला असताना जुन्या वादातून सात जणांच्या टोळीने त्याच्यावर कोयत्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेशचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली. या कारवाईची परिसरात मोठी चर्चा असून, पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!