NEET आंदोलनावर दिविजा फडणवीस यांची प्रतिक्रिया; “ट्रेंड आहे म्हणून आंधळेपणाने बंड करू नका”


NEET आंदोलनावर दिविजा फडणवीस यांची प्रतिक्रिया; “ट्रेंड आहे म्हणून आंधळेपणाने बंड करू नका”

मुंबई/नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणी जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आहे.
दिविजा फडणवीस यांनी म्हटले की, “लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, आंदोलकांकडून किंवा पोलिसांकडून होणाऱ्या हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही.”
त्यांनी पुढे आवाहन केले की, “शैक्षणिक सुधारणांच्या मुद्द्याला पाठिंबा द्या; मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा विचारसरणीचे आंधळेपणाने समर्थन करू नका. कोणत्याही आंदोलनामागील हेतू समजून घेणे महत्त्वाचे आहे.”
सोशल मीडियावरील ट्रेंड्सचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “केवळ ट्रेंड आहे म्हणून आंधळेपणाने बंड करू नका. स्वतःची विचारशक्ती गमावू नका. विद्यार्थ्यांचे हित जपले जात असेल, तर ते योग्य आहे; पण आंदोलन मूळ मुद्द्यांपासून भरकटत असेल, तर त्यामागील हेतूबाबत सावध राहणे गरजेचे आहे.”
दिविजा फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
– प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!