विद्यार्थी हे देशाची सर्वात मोठी आशा; त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे – अनुपम खेर
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हिडिओ संदेश शेअर करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, त्यांनी आंदोलन कोणत्याही राजकीय अजेंड्याचे साधन बनू देऊ नये, असे आवाहनही केले आहे.
अनुपम खेर म्हणाले, “विद्यार्थी हे कोणत्याही देशाची सर्वात मोठी आशा असतात. त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, समजून घेतला गेला पाहिजे आणि त्याचा आदर केला गेला पाहिजे.” तसेच, “माझी एकच प्रार्थना आहे की, तुमचे आंदोलन, तुमचे मुद्दे आणि तुमचा विचार दुसऱ्या कोणाच्या हातातील राजकीय हत्यार बनू देऊ नका,” असेही त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
आपला हा संदेश कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नसून, देशातील तरुणाईच्या भविष्याच्या हितासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
– प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९






