ठाण्यात सिंघानिया स्कूलबाहेर बसला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
ठाणे :ठाण्यातील सौ. सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलबाहेर आज एका बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत माहितीसाठी प्रतीक्षा आहे. संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई
Views: 46





