नाशिकमध्ये गोदावरीला पुराचा मोठा धोका; शाळांना सुट्टी, नागरिकांना हायअलर्ट


नाशिकमध्ये गोदावरीला पुराचा मोठा धोका; शाळांना सुट्टी, नागरिकांना हायअलर्ट

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शुक्रवार (२४ जुलै) रोजी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली असून नदीकाठच्या नागरिकांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणातून सध्या सुमारे १० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग १३ हजार क्युसेक्सपर्यंत वाढल्यास पंचवटी परिसरातील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून तपोवन, पंचवटी आणि गोदावरी नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्ह्यातील सर्व शाळांना शुक्रवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, दारणा, गंगापूरसह जिल्ह्यातील १६ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!