NEET उत्तरपत्रिकेत ५२२ गुण अपेक्षित, निकालात फक्त १५; बीडच्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर न्यायालयाचा NTA ला नोटीस छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्ह्यातील


NEET उत्तरपत्रिकेत ५२२ गुण अपेक्षित, निकालात फक्त १५; बीडच्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर न्यायालयाचा NTA ला नोटीस

छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्ह्यातील विद्यार्थी सोहम गवते याने NEET परीक्षेच्या निकालात मोठी तफावत असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्याचा दावा आहे की, त्याला उत्तरपत्रिकेनुसार ५२२ गुण मिळणे अपेक्षित होते, मात्र स्कोअरकार्डमध्ये केवळ १५ गुण दाखवण्यात आले.
या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ला नोटीस बजावली असून दोन आठवड्यांच्या आत विद्यार्थ्याची मूळ उत्तरपत्रिका न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणीत NTA चे स्पष्टीकरण आणि उत्तरपत्रिकेची पडताळणी होणार आहे.
या प्रकरणामुळे NEET निकालाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548129


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!