महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा. रेड झोनमुक्तीपासून महामार्ग, क्रीडा क्रांती ते महिला उद्योग क्लस्टरपर्यंत विकासाचा व्यापक अजेंडा..!


महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा.
रेड झोनमुक्तीपासून महामार्ग, क्रीडा क्रांती ते महिला उद्योग क्लस्टरपर्यंत विकासाचा व्यापक अजेंडा..!

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासासाठी महापौर रवि लांडगे यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्र सरकारसमोर शहराशी संबंधित महत्त्वाचे विषय प्रभावीपणे मांडत विकासाचा व्यापक रोडमॅप सादर केला. नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळावा, शहराला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा आणि भविष्यातील विकास प्रकल्पांना गती मिळावी, या उद्देशाने त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन सविस्तर चर्चा केली. प्रत्येक बैठकीत शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या ठोसपणे मांडत त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणीला गती देण्याची मागणी करण्यात आली.
यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवडमधील रेड झोनचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला
यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) आठपदरीकरणासाठी प्रलंबित भूमी संपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पाच्या कामास गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास कायम ठेवण्यात यावा.
केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासोबतच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडमध्ये “मेयर्स कप” ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला
याच दौऱ्यात केंद्रीय एमएसएमई मंत्री जितराम मांझी यांचे प्रमुख सल्लागार संदीप पोखरकर यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महिला औद्योगिक क्लस्टर उभारण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे
शहराच्या विकासाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषयांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावेत, अशी भूमिका महापौर रवि लांडगे यांनी ठामपणे मांडली.
विजय अडसूळ प्रतिनिधी


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!