अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी निगडीत महामोर्चा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 59 अनुसूचित जाती-जमातींच्या वतीने शुक्रवारी (दि. 24 जुलै 2026) निगडी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11 वाजता भक्ती-शक्ती शिल्प येथून मोर्चाला प्रारंभ होऊन तहसीलदार कार्यालय, निगडी येथे मोर्चाची सांगता झाली.
या मोर्चामध्ये विविध अनुसूचित जाती-जमातींच्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान सामाजिक ऐक्य आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी घोषणा देण्यात आल्या.
या वेळी रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा अध्यक्षा सौ. गौरीताई शेलार, चऱ्होली तक्षशीला बुद्ध विहारचे अध्यक्ष, शिव-फुले-शाहू-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे युवा नेते जगनभाऊ चव्हाण, प्रमोद शेलार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाच्या माध्यमातून शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
प्रतिनिधी विजय अडसूळ





