आमच्या शांततापूर्ण आंदोलनात अडथळा आणणाऱ्याला चोप दिला जाईल; समाजकंटकांना राज ठाकरे यांचा इशारा


आमच्या शांततापूर्ण आंदोलनात अडथळा आणणाऱ्याला चोप दिला जाईल; समाजकंटकांना राज ठाकरे यांचा इशारा
मुंबई :मुंबईत २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजकंटकांना कडक इशारा दिला आहे. आंदोलनात गोंधळ घालण्याचा किंवा हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मनसे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“जर २६ जुलैच्या आंदोलनात एखादा गुंड घुसला, तर आम्ही त्याला चोप देऊ. अशा लोकांनी माझ्या आंदोलनापासून दूर राहावे,” असे स्पष्ट वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
यावेळी त्यांनी सरकारवरही टीका करत, आंदोलनाची वेळ येण्यापूर्वी सरकारने संबंधित विषयावर चर्चा करून तोडगा काढायला हवा होता, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सीजेपी’ (CJP) च्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याचेही सांगण्यात आले आहे. २६ जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे राज्याचे राजकीय वर्तुळ आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!