मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात पोलिसाचे गैरवर्तन? व्हायरल व्हिडिओनंतर विरोधक आक्रमक; कारवाईची मागणी


मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात पोलिसाचे गैरवर्तन? व्हायरल व्हिडिओनंतर विरोधक आक्रमक; कारवाईची मागणी

मुंबई: मुंबईतील दादर परिसरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका पुरुष पोलिसाने आंदोलक तरुणीशी गैरवर्तन केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

व्हायरल व्हिडिओच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे तसेच त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या व्हिडिओबाबत अधिकृत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत असून, घटनेचा संपूर्ण तपास झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!