प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार


प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
​नवी दिल्ली:
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने मंजूर केला असून, प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान खात्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
​प्रल्हाद जोशी हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असून, ते २००४ पासून कर्नाटकातील धारवाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. संसदीय कामकाज, कोळसा, खाण तसेच इतर महत्त्वाच्या मंत्रालयांचा अनुभव त्यांच्या नावावर आहे. सध्या त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी असून, त्यासोबत शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
​धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय घेतला असून, शिक्षण क्षेत्रातील धोरणे आणि प्रलंबित कामकाज सुरळीत सुरू राहावे, या उद्देशाने ही जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
​प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी
संपर्क: ९८२२५४८४२९


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!