पुणे जिल्ह्यात डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


पुणे जिल्ह्यात डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पुणे:
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असून, त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने डासांच्या उत्पत्तीस्थळांचा नाश करण्यासाठी विशेष मोहिमा सुरू केल्या असून, नागरिकांनी आपल्या घराच्या आणि परिसराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, पाणी साचू देऊ नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास उपचारात विलंब न करता तातडीने जवळच्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्लाही आरोग्य विभागाने दिला आहे.
दरम्यान, डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येबाबत सोशल मीडियावर विविध आकडेवारी प्रसारित होत असली, तरी नागरिकांनी केवळ आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!