पुण्यात कारचा अचानक उघडलेला दरवाजा दुचाकीला धडकला; ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पुणे : लष्कर परिसरात कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीस्वाराचा अपघात होऊन सूर्यकांत बिडकर (वय ५०) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या कारचा दरवाजा उघडताच तो दुचाकीला धडकला. त्यामुळे बिडकर खाली पडले आणि मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरवाजा उघडणारी व्यक्ती महिला असल्याचे समोर आले आहे.
लष्कर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429
Views: 46








