मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडवर संशयास्पद बेवारस बॅग; BDDS पथक घटनास्थळी


मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडवर संशयास्पद बेवारस बॅग; BDDS पथक घटनास्थळी

मुंबई: अमरसन्स ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडवर शनिवारी एक संशयास्पद बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात काही काळ सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले.

माहिती मिळताच गावदेवी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तसेच बॅगेची तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी रवाना झाले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात असून, बॅगेतील वस्तूंची तपासणी सुरू आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलीसांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, तसेच आवश्यक असल्यास वाहतूक व सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

या प्रकरणातील अधिकृत तपशील आणि तपासाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!