सिद्धिविनायक मंदिरात वर्षाला १८ कोटींच्या कथित दानगैरव्यवहाराचा दावा; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप


सिद्धिविनायक मंदिरात वर्षाला १८ कोटींच्या कथित दानगैरव्यवहाराचा दावा; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप करत, मंदिरात दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांच्या कथित दानगैरव्यवहार होत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी हा दावा सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्राच्या आधारे केला.

राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरातील देणगी आणि रोख रकमेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सर्वणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंदिरातील आर्थिक अनियमिततेची बाब समोर आल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिद्धिविनायक मंदिर हे राज्यातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असल्याने या प्रकरणाकडे भाविकांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नसून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!