अखिल भारत हिंदुमहासभेतर्फे पुण्यात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व टिळक भक्तांचा मेळावा उत्साहात संपन्न


अखिल भारत हिंदुमहासभेतर्फे पुण्यात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व टिळक भक्तांचा मेळावा उत्साहात संपन्न

​पुणे:अखिल भारत हिंदुमहासभा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने पुण्यातील ऐतिहासिक टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम, टिळक भक्तांचा मेळावा व प्रदेश कार्यसमिती बैठकीचे आयोजन करण्यात आले.
​कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून करण्यात आली. यावेळी हिंदुमहासभेच्या दिवंगत नेत्या कै. सौ. क्रांतीगीता महाबळ यांनाही भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
​या मेळाव्यात लोकमान्य टिळकांचे कार्य, त्यांचे विचार आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर उपस्थितांनी प्रकाश टाकला. तसेच गुरुपूजन आणि प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीवर व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
​या प्रसंगी अखिल भारत हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्नाभाई शर्मा, उपादक्ष्य अभयसिंग कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल पवार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे, प्रदेश कार्य सहकार्य वाह मनोज तारे,सहकार्य वाह नितीन शुक्ल,, उमेश कुलकर्णी, विवेक परदेशी, विद्या घटवाई, अदिती जोशी, तृप्ती तारे लता दवे राजेंद्र देशपांडे, सूर्यतकांत कुंभार आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने टिळकप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी हिंदू निष्ठ कार्यकर्ते धनसिंग सूर्यवंशी पुरस्कार देण्यात आला जय हिंदुराष्ट्र आणि वंदे मातरमच्या जयघोषात कार्यक्रम उत्साहात पार पडला.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!