भगूर (नाशिक), २ ऑगस्ट २०२६ :
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांनी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक तसेच अखिल भारत हिंदू महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भगवी शाल अर्पण करत विनम्र श्रद्धांजली वाहिली. तसेच या प्रसंगी ‘जयस्तुते’ हे गीत सादर करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात आले.
भेटीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच स्मारकाचे व्यवस्थापन उत्कृष्टपणे सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय सिंह कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल रामभाऊ पवार, प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे, सहकार्यवाह नितीन शुक्ला, उमेश कुलकर्णी, नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. पंकज चव्हाण, बाप्पू ढापसे, अभिषेक शेळके, कौस्तुभ झाकडी, हर्षल अमृतकतकर तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








