खासगी गाडीवर ‘पोलीस’ स्टिकर लावल्यास होणार जप्त.


खासगी गाडीवर ‘पोलीस’ स्टिकर लावल्यास होणार जप्त

मुंबई (३ ऑगस्ट) – महाराष्ट्रात कोणत्याही खासगी वाहनावर ‘पोलीस’ किंवा शासकीय बोधचिन्ह लावणे, हा कायदेशीर गुन्हाच आहे. तरीही अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी कायदा पायदळी तुडवून आपल्या खासगी वाहनांवर तसे स्टीकर लावत असतात. अशांना वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रमुखांनी विशेष सूचना जारी केलीये. असे स्टीकर कुठल्याही गाडीवर दिसल्यास ती गाड्या त्वरित जप्त कराव्यात आणि दंड ठोठावावा, असं या सूचनेत स्पष्ट केलंय. हा नियम पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्वतःच्या खासगी वाहनांनाही समान लागू आहे. मोटार वाहन अधिनियम (Motor Vehicles Act) आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार ही कारवाई केली जाणार आहे.

प्रतिनिधी – दिलीप लोखंडे श्रीरामपूर


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!