आरोपींना मारहाण प्रकरण: मानवी हक्क आयोगाची चौकशी; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची बदली


आरोपींना मारहाण प्रकरण: मानवी हक्क आयोगाची चौकशी; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची बदली

पुणे: पुण्यात आरोपींना पोलीस ठाण्यात मारहाण व गैरवर्तन झाल्याचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
आयोगाच्या तीन सदस्यीय समितीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भेट देत प्रत्यक्ष चौकशी सुरू केली आहे. तसेच, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची तातडीने विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!