शेती कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती


शेती कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
मुंबई :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता दुसरी यादीही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, सध्या आयकर विवरणपत्र (ITR) भरणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी तसेच केवायसी (KYC) प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही कर्जमाफी योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र शेतकऱ्यांसाठी असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
याशिवाय, राज्यातील खरीप हंगामासाठी सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. उर्वरित भागातील पेरण्या लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
— प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!