प्रशांत किशोर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई: प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयानंतर प्रशांत किशोर प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून, त्यानंतर झालेल्या या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.
मात्र, प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या चर्चेचा नेमका विषय किंवा भेटीमागील कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 28






