धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : १५ कृषी अधिकारी निलंबित


धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : १५ कृषी अधिकारी निलंबित
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी मोठी कारवाई करत १५ कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेअंतर्गत भूमिहीन, मयत तसेच दुबार शेतकऱ्यांच्या नावे तब्बल २ कोटी ३२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणात दोन जिल्हा कृषी अधीक्षक आणि आठ तालुका कृषी अधिकाऱ्यांसह एकूण १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या घोटाळ्याची तक्रार आमदार कैलास पाटील यांनी केली होती. चौकशीनंतर गैरव्यवहार सिद्ध झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून या निर्णयामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!