तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय


तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई : तहलका मासिकाचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार तरुण तेजपाल यांना कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दोषी ठरवले आहे. गोव्यातील एका रिसॉर्टमधील लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
या प्रकरणात यापूर्वी २०२१ मध्ये गोव्यातील सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्या निर्णयाला आव्हान देण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत त्यांना दोषी ठरवले.
त्यानंतर न्यायालयाने तरुण तेजपाल यांना १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ चर्चेत असलेल्या या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!