हिंजवडीतील इन्फोसिस कॅम्पसमध्ये भारत-अमेरिकेच्या सुरक्षा दलांचा संयुक्त ‘मॉक ड्रिल’; कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ घबराट


हिंजवडीतील इन्फोसिस कॅम्पसमध्ये भारत-अमेरिकेच्या सुरक्षा दलांचा संयुक्त ‘मॉक ड्रिल’; कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ घबराट
पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कॅम्पसमध्ये ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ९ या वेळेत भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षा दलांचा संयुक्त ‘मॉक ड्रिल’ (सराव) पार पडला.
या सरावात अमेरिकेचे १७ कमांडो, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG), फोर्स वन आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची पथके सहभागी झाली होती. संभाव्य दहशतवादी हल्ल्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
हे प्रात्यक्षिक अत्यंत गुप्ततेने आयोजित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे काही काळ इन्फोसिस कॅम्पस आणि परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, हा केवळ सुरक्षा यंत्रणांचा नियोजित सराव असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!