बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर CET कक्षाचा मोठा निर्णय; प्रवेश होणार रद्द


बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर CET कक्षाचा मोठा निर्णय; प्रवेश होणार रद्द

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेबाबत (CAP) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कागदपत्रांच्या पडताळणीत चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी कागदपत्रे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश तत्काळ रद्द करण्यात येणार आहे.
याशिवाय, बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे CET कक्षाने स्पष्ट केले आहे.
तसेच, कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता प्रवेश देणाऱ्या संबंधित शैक्षणिक संस्थांवरही नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यावर CET कक्षाने भर दिला आहे

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429.


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!