पुणे रेल्वे स्थानकासमोरील रिक्षात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बोथट हत्याराने हत्या


पुणे रेल्वे स्थानकासमोरील रिक्षात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बोथट हत्याराने हत्या

पुणे : पुणे रेल्वे स्थानकासमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका रिक्षात ३ ऑगस्टच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपासात बोथट हत्याराने डोके, छाती आणि पाठीवर गंभीर वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सध्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशी करून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!