ठाणे : बांधकामस्थळी मजुराची गळफास घेऊन कथित आत्महत्या; कासारवडवली पोलिसांकडून तपास सुरू
ठाणे : कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूलजवळ असलेल्या तारांगण सोसायटीमध्ये एका मजुराने बांधकामाच्या ठिकाणी गळफास घेऊन कथितरित्या आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या इमारतीच्या सिव्हिल दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, तपासानंतरच घटनेबाबत अधिक तपशील समोर येणार आहेत.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 78






