पोलीस अधिकाऱ्यांवर अभिजीत दिपके भडकले; ‘तुम्ही बाहेर जा’ म्हणत घराबाहेर जाण्यास सांगितल्याचा दावा.


पोलीस अधिकाऱ्यांवर अभिजीत दिपके भडकले; ‘तुम्ही बाहेर जा’ म्हणत घराबाहेर जाण्यास सांगितल्याचा दावा

 

 

छत्रपती संभाजीनगर : अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी पोलीस अधिकारी आणि त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची घटना समोर आली आहे. दिपके यांच्या घरी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी पोलीस उद्धटपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी दिपके यांनी पोलिसांना सुनावत, “मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी ठरवायचं नाही, तो निर्णय मी घेणार,” असे स्पष्टपणे सांगितल्याचे समोर आले आहे.

वाद वाढल्यानंतर दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला “तुम्ही बाहेर जा,” असे म्हणत घराबाहेर जाण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या वादामागील नेमके कारण आणि पोलिसांची भूमिका याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेवरून पुढील काळात काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!