शहदा बस स्थानकावर सायंकाळी ५ वाजता टवाळखोरांचा धुडगूस; विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्याची मागणी!.


शहदा बस स्थानकावर सायंकाळी ५ वाजता टवाळखोरांचा धुडगूस; विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्याची मागणी!..

सोमेश मुळे शहदा:
येथील मुख्य बस स्थानक परिसरात सायंकाळी शाळा आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळेस विद्यार्थिनींची छेडछाड आणि टवाळखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा त्रास सातत्याने सुरू असून, यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालये सायंकाळी ५ वाजता सुटतात. यानंतर ग्रामीण भागात जाण्यासाठी शेकडो मुला-मुलींची शहदा बस स्थानकावर प्रचंड गर्दी होते. नेमक्या याच वेळेचा गैरफायदा घेत शहराबाहेरून येणारे काही टवाळखोर तरुण बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसतात.

हे बाहेरील तरुण बस स्थानक व आसपासच्या परिसरात विनाकारण फिरत राहतात. मोठ्याने आरडाओरड करणे, वाहने अस्ताव्यस्त चालवून गोंधळ घालणे आणि बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींवर अश्लील शेरेबाजी करणे असे प्रकार दररोज घडत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मुलींची छेड काढली जात असल्याने विद्यार्थिनींमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बस स्थानक परिसरात पोलिसांची गस्त असणे अत्यंत गरजेचे आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!