चारित्र्यावर संशय घेत गरोदर विवाहितेला अमानुष मारहाण; बळजबरीने डेटॉल पाजल्याचा आरोप
पुणे : चारित्र्यावर संशय घेत २२ वर्षीय गरोदर विवाहितेला पती आणि सासूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. यावेळी पीडितेला बळजबरीने डेटॉल पाजल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पती प्रतीक पिंगळे (वय २७) आणि सासू वंदना सुनील पिंगळे (वय ४५, दोघेही रा. अक्कलकोट) यांच्याविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि सासू यांनी पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिला बळजबरीने डेटॉल पाजल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार काळेपडळ पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




