स्वामी समर्थ शाळेत डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी जनजागृती; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन
मुंबई | जोगेश्वरी पूर्व :
स्वामी समर्थ शाळा, जोगेश्वरी (पूर्व), कीटक नियंत्रण विभाग (के/उत्तर वार्ड) आणि नटवर नगर हेल्थ पोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रात्यक्षिक (Demo) व जनजागृती (Awareness) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यात डासांची पैदास कशी होते, डासांमुळे डेंग्यू व मलेरियासारखे आजार कसे पसरतात आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.
के/उत्तर विभागाच्या कीटक नियंत्रण विभागातील अधिकारी तसेच नटवर नगर हेल्थ पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे याबाबतही विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत व समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ शाळेतील शिक्षकवृंदाने घेतलेले परिश्रम आणि दिलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई






