RTO कारवाईने संतप्त ट्रक चालकाने समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावला; २ तास वाहतूक ठप्प


RTO कारवाईने संतप्त ट्रक चालकाने समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावला; २ तास वाहतूक ठप्प

समृद्धी महामार्ग : RTO अधिकाऱ्यांनी चलान केल्याने संतप्त झालेल्या हरियाणातील एका ट्रक चालकाने समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा उभा करून वाहतूक रोखल्याची घटना घडली.
ही घटना चॅनेल क्रमांक ५०, नागपूर-मुंबई मार्गावर घडली. RTO अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर चालकाने रागाच्या भरात हा प्रकार केल्याची माहिती आहे. ट्रक आडवा उभा केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, ट्रक चालकाविरोधात सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!