आंबा घाटात वाहतुकीवर पूर्णबंदी; मुसळधार पावसामुळे रस्ता खचला
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ता खचला असून रस्त्यावर मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे दरड कोसळण्याचा तसेच रस्ता आणखी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी बससह सर्व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ पूर्णबंदी घालण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
ही कारवाई आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत करण्यात आली असून, परिस्थिती सुरक्षित होईपर्यंत वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 32




