अमित शाह पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी; रेवती सुळेंच्या रिसेप्शनला उपस्थिती
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानंतर दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून अमित शाह आणि राहुल गांधी यांची उपस्थिती राहिल्याने या सोहळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 39




