जालन्यात पोलिसांची मोठी कारवाई; ४१ घातक शस्त्रे जप्त, एकाला अटक
जालना : जालना शहरातील सुंदरनगर भागात पोलिसांनी कारवाई करत ४१ घातक शस्त्रे जप्त केली. यामध्ये तलवारी, खंजीर आणि चॉपरचा समावेश आहे.
ही शस्त्रे अजमेरहून कुरिअरद्वारे मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून जप्त शस्त्रांची किंमत सुमारे १ लाख ३४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी एका फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 36






