सीसीटीव्ही बंधनकारक; कोल्हापूर विभागातील ५३९ परीक्षा केंद्रांचे फेरपरीक्षण
कोल्हापूर : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने ५३९ परीक्षा केंद्रांचे फेरपरीक्षण सुरू केले आहे.
परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत कार्यान्वित सीसीटीव्ही असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुरेशी विद्यार्थीसंख्या किंवा आवश्यक भौतिक सुविधा नसलेल्या केंद्रांवर कारवाई करून ती रद्द केली जाऊ शकतात.
यातील १७४ केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली असून विशेष पथकांकडून त्यांची प्रत्यक्ष पाहणी सुरू आहे. सर्व केंद्रांचा तपास पूर्ण करून २० ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच नियमानुसार प्रत्येक वर्गखोलीत २५ विद्यार्थ्यांची बैठक क्षमता असणे आवश्यक आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




