*शिवप्रहार न्यूज-RPI चे लढावू नेते राजाभाऊ कापसे यांचे निधन…*

टाकळीभान प्रतिनिधी- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे खंदे,विश्वासू समर्थक व रिपाईचे लढावू नेते राजाभाऊ कापसे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्याचे वय वर्षे 55 होते.काल मंगळवारी मुलगा विकी कापसे याच्यासह राजाभाऊ पुणे येथे कामानिमित्त गेले होते.तेथे राजाभाऊ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले तेव्हा मुलगा विकी कापसे यांनी म्हटले की, आपण लगेच दवाखान्यात जावू मात्र दवाखान्यात जाईपर्यंत राजाभाऊ कापसे यांचे तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.आज बुधवारी सकाळी 10:30 पर्यंत त्यांचा पार्थीव देह वाकडी या त्यांच्या गावी आणण्यात येणार असून दुपारी 4:30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राजाभाऊ कापसे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभवाचे होते.श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवून 20 हजारांहून अधिक मते घेवून ते राज्यात परिचित झाले होते.श्रीरामपूरसह जिल्हयात त्यांनी शेवटपर्यंत रिपाई आठवले गटाचे मोठे काम केले.त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर






