पिंपळवंडी हादरली; चिमुकलीवरील अत्याचारानंतर निर्घृण हत्या


पिंपळवंडी हादरली; चिमुकलीवरील अत्याचारानंतर निर्घृण हत्या

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे आणि पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चिमुकलीवरील अत्याचाराच्या या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि दोषींना तातडीने शिक्षा होणे गरजेचे आहे.

चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे!
दोषीला कठोरात
कठोर शिक्षा झाली पाहिजे!

प्रतिनिधी स्वप्नील लुनावत


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!