खडकीतील चिखलवाडीत ड्रेनेजच्या कामानंतर रस्त्याची दुरवस्था; प्रशासकीय दुर्लक्षामुळे घरात साचतेय पाणी


खडकीतील चिखलवाडीत ड्रेनेजच्या कामानंतर रस्त्याची दुरवस्था; प्रशासकीय दुर्लक्षामुळे घरात साचतेय पाणी
​खडकी, पुणे:
खडकी परिसरातील चिखलवाडी येथे ड्रेनेज लाईन्सचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण न केल्याने स्थानिक नागरिकांना गंभीर हाल सोसावे लागत आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिक राजेश येडलेलू यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही आणि ठेकेदाराकडून अद्याप कोणतेही काम करण्यात आलेले नाही.
​ड्रेनेजच्या खोदकामानंतर रस्ता पूर्ववत न केल्यामुळे आणि सिमेंट काँक्रीटीकरण रखडल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. दररोज चिखल आणि माती घरात येत असल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, चारी बाजूंच्या भिंतींमध्ये पाणी जिरपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरांच्या बांधकामालाही धोका निर्माण झाला आहे.
​प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन निष्काळजी ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी आणि परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण त्वरित पूर्ण करावे, अशी आक्रमक मागणी पीडित नागरिकांकडून केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

 


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!