लेखी पत्रानंतर खिर्डी येथील पीडित कुटुंबाचे उपोषण मागे.


लेखी पत्रानंतर खिर्डी येथील पीडित कुटुंबाचे उपोषण मागे

टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 74, 333, 118(1), 115(2), 352, 352(2)(3), 189(2), 191(2)(3), 190 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मधील कलम 3(1)(w)(i), 3(1)(r)(s) आणि 3(2)(v-a) आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी खिर्डी येथील पीडित कुटुंबाने सुरू केलेले उपोषण अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. पीडित कुटुंबाने 15 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारती समोर संत तेरेजा चौक येथे कुटुंबासह वरून उपोषणास बसले होते. अखेर शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी लेखी आश्वासनास नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की,

संबंधित गुन्ह्यात राहुल विठ्ठल धायगुडे (वय ३६) याला १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११.११ वाजता अटक करण्यात आली आहे. तसेच पंकज विठ्ठल धायगुडे , विशाल भगवान म्हसाळ, जालू ऊर्फ जालिंदर सोमनाथ देवकाते, बाबासाहेब ऊर्फ बाबू भाऊसाहेब हाळनोर आणि जनार्दन ऊर्फ जना बाबादी विटनोर( सर्व राहणार खिर्डी, तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर ) यांचा शोध घेऊन मिळून येतात त्यांना सदर गुन्ह्यात अटक करीत आहोत तरी आपण आपले उपोषण मागे घेऊन पोलीस तपासत सहकार्य करावे असे आश्वासन पीडित कुटुंबाला देण्यात आले आहे.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे ,श्रीरामपूर लहुजी शक्ती सेनेचे प्रवीण वैरागर ,विजय शेलार,आकाश अडंगळे,अर्जुन दोडके, विशाल शिरसाठ,अमोल मिसाळ, ज्ञानेश्वर जगधने,कांतिलाल जगधने, रवि शेलार,सीताराम शिरसाठ आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!